। कोर्लई । वार्ताहर ।
श्री जगद्गुरु नरेंद्र महाराज नाणीज धाम तर्फे मुरुड तालुक्यातील उसरोली फाटा येथील आगरी समाजाच्या सभागृहात रमेश दिवेकर यांच्या हस्ते व मनीष नांदगावकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा उपस्थितित रक्तदान महायज्ञ शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. नरेंद्र महाराज नाणीज धामकडून दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवर याही वर्षी दि.4 ते दि. 19 जानेवारी या कालावधीत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, संप्रदाय तालुका अध्यक्ष अंकुश वाडकर, जिल्हा महिला अध्यक्षा अंजली जगताप, तालुका महिला अध्यक्षा प्राची पाटील, ब्लड कॅम्प पी.आर.ओ. संतोष चोरघे, सुधीर पुलेकर, अनंता भगत, किशोर भगत,तालुका सचिव जितेंद्र पाटील, सर्व संग्राम सैनिक यावेळी उपस्थित होते.