। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुडचे अंजुमन महाविद्यालय आणि पनवेलचे आर. झुनझुनवाला शंकरा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.11) महाविद्यालयाच्या सभागृहात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मुरुड परिसरातील सुमारे 120 जणांनी शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात रुग्णांना स्वस्त दरात चष्मे देण्यात आले. महाविद्यालयाचे अध्यक्ष जैनुद्दीन कादिरी आणि प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेषकरून या शिबिरात रस्ता सुरक्षा अभियान निमित्त स्कूल व्हॅन, मिनीडोर व ऑटोरिक्षा चालक तसेच पोलीस कर्मचार्यांची ही नेत्रतपासणी करण्यात आली. या शिबिरादरम्यान अल्ताफ मलिक, इम्रान मलिक, इस्माईल शेख, तौसिफ़ फत्ते, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार संतोष गायकवाड, सहाय्यक फौजदार महेंद्र खोत, पोलिस हवालदार प्रशांत म्हात्रे, किशोर पठारे आणि मंगेश कावजी उपस्थित होते.