अलिबाग पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग गोंधळपाडा येथील सुप्रसिध्द रॅडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा ने कॉपी राईट भंग केल्या बाबत अलिबाग पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 23 मार्च 2020 रोजी 00:00 वा ते दि. 04 नोव्हेंबर 2021 रोजी 00:00 वा च्या दरम्यान रॅडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा, गोंधळपाडा, अलिबाग दिनांक 23 मार्च 2020, 02 एप्रिल 2020, 04 नोव्हेंबर 2021 रोजी हॉटेल रॅडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा, गोंधळपाडा, अलिबाग, यांचे व्यवस्थापनातील 4 आरोपी सर्व रा.हॉटेल रॅडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा, गोंधळपाडा, अलिबाग यांनी इसॉस व यशराज या कंपनीचे स्वामित्व हक्क असलेली गीते वाजवून सर्व कंपनींच्या कॉपी राईटचा भंग केलेला आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे प्रकाशन हक्क (कॉपी राईट) अधिनियम,1957 चे कलम 63,69,51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव हे करीत आहेत.