| बीजिंग | वृत्तसंस्था |
गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना केसेस झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. रविवारी (दि.4) चीनमध्ये 13 हजार 146 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. चीनमधील हा कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या दोन वर्षातील कोरोना लाटेमधील सर्वाधिक वाढीचा असल्याने पुन्हा एकदा जगाची डोकेदुखी वाढल्याचे दिसत आहे. यामधील 1 हजार 455 कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आहेत, तर 11 हजार 691 लक्षणे नसलेली केसेस नोंदवल्या आहेत. तथापि, यामध्ये कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही.