इंजिन होंडयाची जत्रा, कोळी बांधव व भगिनीचा जल्लोष
| रेवदंडा | महेंद्र खैरे | कोरोना कालावधीत दोन वर्ष स्थगित असलेल्या आग्राव पुर्वपाडा आयोजीत पारंपारिक शिडवाल्या होडयाच्या शर्यतीचा पुनस्यः थरार कुंडलिका समुद्रखाडीत पहावयास मिळाला, शिडवाल्या होडयाच्या शर्यतीसह इंजिन होडयाची जत्रा, आणी पाहूणे मंडळी, व पंचक्रोशीतील पै-पाहूणे यांच्यासह या होडयातून आनंद साजरा करणारे कोळी बांधव व भगिनीचा जल्लोष, व उत्साह व्दिगुणीत झाला होता.
प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या दुसर्या दिवशी आग्राव पुर्वपाडा दर्यातंरग मित्रमंडळ व मंगळा गौरी महिला मंडळ यांचे विदयमाने पारंपारिक शिडवाल्या होडयाच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पुर्वी सकाळी दहा वाजता एकविरा मातेचा मानाचा नारळ, पालखीतून गावात फिरविण्यात आला, या आग्राव मध्ये गुढी पाडवा दोन दिवस साजरा केला जातो, घराघरात उभारलेली गुढी सुध्दा दोन दिवस उभारली जाते. पालखीतील मानाचा नारळाची पुजा, आग्राव गावात घराघरातून केली जाते, मग ही पालखी होडीतून पारंपारिक कुंडलिका समुद्र खाडीत एकविरा मातेला अर्पण केला जातो. पुर्वी एकविरा कार्लाला जाण्यास होडयांचा मार्ग होता, मात्र कालाच्या ओघात हा मार्ग बंद पडला, परंतू प्रथा म्हणून पारंपारीक शिडवाल्या होडयाची शर्यत आग्राव मधून आयोजीत केली जाते. दुपारी एक वाजता शेकापक्षाचे अॅड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्या चित्राताई पाटील यांचे हस्ते ज्योतीचा इशारा व अॅटमबॉम्बच्या आवाजाने शर्यत्ीस प्रांरभ झाला, यावेळी शर्यतीचे समन्वयक उमेश मोरे,आयोजक अध्यक्ष रणजीत धरणकर, उपाध्यक्ष सुभाष ढेबरी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.
या शर्यतीस प्रथम क्रमांकास 41 हजार रूपये रोख व चषक, व्दितीय क्रमांकास 31 हजार रूपये रोख व चषक, तृतीय क्रमांकास 21 हजार रूपये रोख व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या शर्यतीत जानतीवर होडी आग्राव येथील कै. कमळाकर नारायण नाखवा यांची होती. तर या शर्यतीत विश्वानाथ डोयले, रामदास चौगले, प्रभाकर लोदीखान, निकेश नाखवा, नथुराम अष्टमकर, चंद्रकात पाटील, महेंद्र सरदार, कनक चोगले, विजय चौगले यांची पंच म्हणून काम पाहिले.
सहा शिडवाल्या होंडयानी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, यामध्ये कोर्लईच्या शिडवाल्या होडीने प्रथमच बाजी मारून प्रथम क्रमांक पटकाविला, तर आग्राव येथील शिडवाल्या होडयानी व्दितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. आग्राव येथे मान्यवरांचे उपस्थितीत बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.