अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 19 नवे रुग्ण, दोन रुग्णांचा मृत्यू, 28 कोरोनामुक्त

तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
“अलिबाग तालुक्यात आज बुधवार दि 9 फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या 19 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उपचारा दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर 28 रुग्णांनीे कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती अलिबाग तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 100 झाली आहे. यापैकी 627 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 22 हजार 263 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 210 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. “

Exit mobile version