। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय तुरुंग प्रशासनाने अनेक कैद्यांची तुरुंगातून सुटका केली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, संबंधित कैद्यांना पुन्हा बोलावून घेण्यात आले आहे. दरम्यान कल्याण येथील आधारवाडी कारागृहात कोरोना विषाणूचे संक्रमण पुन्हा एकदा झाल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत माहिती देताना तुरुंग अधिकार्यांनी सांगितलं की, सर्व कोरोना बाधित रुग्णांना ठाण्यातील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याआधी एप्रिल 2021 मध्येही आधारवाडी कारागृहात 30 कैदी कोरोना संक्रमित आढळले होते.