नियमांचा भंग केल्यास कारवाई करणार – तहसीलदार सचिन गोसावी
। दिघी । प्रतिनिधी ।
गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत आपण सर्वांनीच कोरोनाचा अतिशय सक्षमपणे प्रतिकार केला आहे. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नियमांचा भंग करणार्या व्यक्ती विरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल असे प्रतिपादन श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांनी केले आहे.
तालुक्यात विविध प्रशासकीय यंत्रणेतील कार्यरत असणार्या अधिकारी वर्गाना तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोसावी म्हणाले, कोरोना अजून पूर्णतः संपलेला नाही. अशा प्रसंगी विनाकारण नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तींविरोधात प्रशासनाने कारवाई करण्याची सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध भागातून समुद्रकिनार्यांवर लोकांची गर्दी निदर्शनास येते. गर्दी म्हणजे विनाकारण कोरोनाला दिलेले आमंत्रण आहे. गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे सचिन गोसावी यांनी सांगितले आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तींविरोधात पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कारवाई केली जाईल. समुद्र किनार्या होणार्या पार्ट्यावर पोलिसांची करडी नजर आहे.
प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक श्रीवर्धन.
श्रीवर्धन पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.
उद्धव होळकर गटविकास अधिकारी श्रीवर्धन.