। अलिबाग । वार्ताहर ।
समाजसेवा हीच ईश्वरसेवा समजून कोव्हिड कोरोना काळात सामाजिक बांधिलकी ठेवून समाज सेवेचे व्रत घेतलेले उमेश सखाराम पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्या हस्ते कोरोनायोद्धा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाद्वारे प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय, अलिबाग येथे त्यांचा छोटेखानी समारंभात वाढदिवस तसेच कोविड काळात त्यांनी जनतेला केलेली मदत या निमित्ताने शुभेच्छापर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेविका वृषाली ठोसर, नगरसेवक राकेश चौलकर, अलिबागचे नगराध्यक्ष यांच्या वतीने त्यांचे स्विय सहाय्यक संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मानसी म्हात्रे यांच्या हस्ते पुष्षगुच्छ देऊन उमेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मंचाचे सल्लागार श्रीरंग घरत, माजी नगरसेवक आर.के. घरत, नाट्यकर्मी जगदीश नागे, सौ.व श्री विकास पाटील, नंदू तळकर, विनोद टेंबुलकर, अॅड. राजेंद्र जैन, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
उमेश पवार यांना कोरोनायोद्धा पुरस्कार
