वनविभागाचे मात्र दुर्लक्ष
ठेकेदार आणि अधिकार्यांचे साटेलोटे
। म्हसळा । वार्ताहर ।
रोहा वनविभाग तालुका म्हसळामध्ये 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्री वादळात सरकारी राखीव वनात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली होती. त्यामधील साळविंडे-वरवठणे सरकारी वनातील तीन ते चार हजार झाडांचा लिलाव करण्यात आला. परंतु, लिलावाच्या नावाखाली उभी असलेली वनविभागाच्या मालकीची उभी सरसकट तोडून पूर्ण जंगल भुईसपाट करण्यात आले आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मंत्र जगाला देणारे वनखात्याने जणू दिल्याप्रमाणे ‘पूर्ण झाडे तोडा आणि जंगले ओसाड करा’ असा मंत्र ठेकेदाराला दिल्यासारखी परिस्थिती वनविभागाने केल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळी दिसून येत आहे. या वनक्षेत्रात ठेकेदाराने लिलावाचे 10 पटीने अंदाजे 15 ते 20 हजार उभ्या जिवंत झाडांची जणू काही कत्तल केलेली दिसून येत आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचे अंकुश नसल्यामुळेच हा प्रकार घडून संपूर्ण जंगलाची नासाडी झाल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांनातू ऐकावयास मिळते.
जंगल तोड होऊन पर्यावरणाचा र्हास होऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने गॅस वाटप, पाळीव प्राण्यांपासून झालेल्या नुकसानपायी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई अशा अनेक योजना राबविल्या जात होत्या. पूर्वजांनी जतन करून ठेवलेले हे वन वनविभागाच्या कर्मचार्यांच्या सहमतीनेच जमीनदोस्त केल्याची चर्चा सुरु आहे. याविरोधात आवाज उठविणार्या काही मंडळींची तोंडे आर्थिक व्यवहार करून बंद केल्याचीही जोरदार चर्चा आहे. नुकतेच याच हद्दीतील साळविंडे ग्रुप ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील दुसर्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले असून, वनविभागातील या प्रकारामुळे सर्वांनाच आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोषींवर कारवाई कधी?
एकीकडे श्रीवर्धन पर्यटन महोत्सव साजरे होत असताना, वनविभाग मात्र जंगले नष्ट करण्यात व्यस्त असल्याचे बोलले जाते. हा अनधिकृतपणे तोडलेला माल सरकार जमा करावा आणि ज्या कर्मचार्याने या मालवाहतुकीसाठी पास दिला आणि यामध्ये दोषी असणार्या संबंधित सर्व कर्मचार्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. असे प्रकार बिनबोभाट सुरु राहिल्यास भविष्यात तालुक्यातील वने नष्ट होऊन वाळवंट तयार होऊन ग्लोबल वॉर्मिंगसारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.