| खोपोली | प्रतिनिधी |
जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत काटरंग धनगरवाडी परिसरात गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून मांस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सणासुदीच्या काळात हा प्रकार समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. रविवारी रात्री गवतामध्ये गोवंशाची कत्तल झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी खोपोली पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डुकरे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. घटनास्थळी चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा आढळून आल्याने कत्तलीनंतर मांस वाहनातून नेण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
धनगरवाडीत गोवंशाची कत्तल
