| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या आठ दिवसांपासून पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत हद्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पायी गस्त मोहीम राबविण्यात येत असल्याने गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी बसली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडघर फाटा ते काळीवाडा, मुसलमान नाका, टपाल नाका, पंचरत्न चौक, सिंधी हॉल, प्रशांत लॉज, गांधी हॉस्पिटल, आमदार निवास, मिडलक्लास सोसायटी, पुरोहित सोसायटी, एसबीआय बँक, बीजेपी कार्यालय, कर्नाळा भाजी मार्केट, जव्हेरी बाजार, जयभारत नाका, लाईन आळी, दि.बा. पाटील शाळा, सावरकर चौक, टिळक रोड, उपजिल्हा रूग्णालय, परदेशी आळी, सावरकर चौक, वडाळे तलाव, अशोक बाग, प्राचीन हॉस्पीटल, प्रांत ऑफिसकडून पनवेल शहर पोलीस ठाणे अशी पायी गस्त करण्यात आली. या पायी गस्तीकरिता 1 वपोनि, 1 पोनी, 5 सपोनी/पोउपनि तसेच 19 अंमलदार हजर होते. यावेळी बेकायदेशीर व्यवसाय करणार्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच वडाळे तलाव परिसरात दुचाकी तसेच चारचाकी वाहने वेगाने चालविणे, वाहतूक कोंडी करणे आदींवरसुद्धा कारवाई करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना मार्गदर्शनसुद्धा यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचे पनवेलकरांनी कौतुक केले आहे.
पोलिसांच्या गस्तीमुळे गुन्हेगारीला आळा
