। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या वृध्देच्या हातांमधील सोन्याच्या अठ्ठ्यांऐशी हजार रुपये किंमतीच्या बांगड्या लंपास करणार्या कंत्राटी महिला कर्मचारी विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत घडली असून याबाबत निधन पावलेल्या वृध्देच्या नातीने अर्जाव्दारे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार दिली होती. चौकशीअंती घटित प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबधित कंत्राटी महिला कर्मचार्यास नोकरीवरुन निलंबित करण्यात आले. याप्रकरणातील पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.