तालुका सभेत कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा
महाड | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुका काँग्रेस पक्षाची सभा दळवी फार्म हाऊस मोरगिरी येथे संपन्न झाली त्या सभेमध्ये तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सर्वानुमते नाना जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जोमाने करतील आणि आम्ही सर्व जगताप कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.
आज काँग्रेस पक्षाची निर्धार जनसंपर्क अभियान सभा नानासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलादपूर येथे संपन्न झाली.
या वेळी तालुका अध्यक्ष अजय सलागरे,उपसभापती शैलेश सलागरे,जिल्हा काँग्रेसचे खजिनदार दिलीप भागवत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर सकपाळ,विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीयश जगताप महाड तालुका अध्यक्ष राजुशेठ कोरपे,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंतजी पार्टे, युवकांचे आशास्थान केके(कृष्णा कदम),खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडूशेठ देशमुख, मोहनजी शिंदे,तालुका युवक अध्यक्ष प्रवीण महाडिक,शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल भुवड, रघुनाथ वाडकर,प्रकाश साळवी,योगेश शिंदे, नामदेव शिंदे,दीपक सकपाळ सर,ज्ञानेश्वर सकपाळ, मुन्ना खांबे व सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते