। खेड । प्रतिनिधी ।
खेड शहरातील डॉ. गणपत गांधी यांच्या सोनोग्राफी सेंटरमधील कर्मचारी महिला रुग्णांना अपमानास्पद वागणूक देत असून त्यांच्याशी हेटाळणीजनक शब्दांत संवाद साधल्याप्रकरणी या सोनोग्राफी सेंटरची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे पत्र रिपाईच्या महिला अध्यक्ष रेश्मा तांबे येथील तालुका वैधकीय अधिकारी तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक यांना दिले आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॉ.धारिया यांनी आपल्या एका महिला रूग्णाला सोनोग्राफीसाठी संबंधित सेंटरला पाठविले होते. सलग तीन दिवस त्यांनी फेर्या मारूनसुद्धा सोनोग्राफीसाठी तुमचा नंबर अजून आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी विनंती करून सुद्धा येथील कर्मचारी महिलेने त्यांच्यासह अपमानास्पद वर्तन करत, आम्हाला तुमची गरज नसून डॉ.धारिया यांना आम्ही सांगितले नव्हते त्याचे रुग्ण पाठवायला, अशा शब्दांत हेटाळणी केली. यासंदर्भात तालुका वैधकीय अधिकारी कोणती भूमिका घेतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.