• Login
Monday, August 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लाडकी बहीण योजना: अपात्रांना 9 हजार 605 कोटींचा लाभ!

Antara Parange by Antara Parange
August 22, 2026
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
लाडकी बहीण योजना: अपात्रांना 9 हजार 605 कोटींचा लाभ!
0
SHARES
244
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरटीआयमधून धक्कादायक माहिती उघड

| मुंबई | प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांना 9 हजार 605 कोटी रुपये वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे, ही रक्कम 31 मार्च 2025 रोजी पीएम केअर्स निधीत असलेल्या 8 हजार 452 कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या पडताळणी प्रक्रियेवर तसेच हजारो कोटींच्या सार्वजनिक निधीच्या वापरावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एका वृत्तपत्राने माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा सुधारणा करण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी यादीतून वगळण्यात आले. मात्र, त्यापूर्वी अशा लाभार्थ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी वितरित झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

त्यामुळे एका बाजूला राज्याच्या तिजोरीवर योजनेचा वाढता आर्थिक भार असल्याची चर्चा होत असताना, दुसऱ्या बाजूला अपात्र लाभार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कसा वितरित झाला, याचा हिशेब सरकारला द्यावा लागणार आहे. लाभार्थी निवड, पडताळणी आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेत नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू शकते.

कोणत्या कारणांमुळे लाभार्थी अपात्र ठरले?
योजनेची पडताळणी करताना सुमारे 62 लाख लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण केली नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना यादीतून वगळण्यात आले. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या सुमारे 16 लाख लाभार्थींनाही अपात्र ठरवण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 3 लाख 60 हजार लाभार्थ्यांना वगळण्यात आले. एका कुटुंबातील दुसऱ्या सदस्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 2 लाख 50 हजार नावे कमी करण्यात आली. तसेच 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे 1 लाख 80 हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले. याशिवाय सरकारी सेवेत असलेल्या सुमारे 4 लाख 50 हजार कर्मचाऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले. जिल्हास्तरीय पडताळणीनंतर आणखी 1 लाख 70 हजार लाभार्थी अपात्र ठरले.
24 महिन्यांत 76 हजार कोटींचा खर्च
लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारने 24 महिन्यांत तब्बल 76 हजार 231 कोटी रुपये खर्च केले आहेत. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच कालावधीत अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9 हजार 605 कोटी रुपये वितरित झाले. सध्या सुमारे 1 कोटी 65 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. नोव्हेंबर 2025 पर्यंत सुमारे 2 कोटी 1 लाख लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळाला होता. फेब्रुवारी आणि मे 2025मध्ये लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 4 लाखांपर्यंत पोहोचली होती. अपात्र लाभार्थी वगळल्यानंतर योजनेच्या मासिक खर्चातही मोठी घट झाली आहे. पूर्वी सुमारे 5 हजार 450 कोटी रुपये मासिक वितरण अपेक्षित असताना आता हा खर्च 3 हजार 640 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
पीएम केअर्सच्या शिल्लकीपेक्षाही अधिक निधी
31 मार्च 2025 रोजी पीएम केअर्स निधीत 8 हजार 452 कोटी रुपये शिल्लक असल्याचे लेखापरीक्षण अहवालातील माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्या तुलनेत लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वितरित झालेली 9 हजार 605 कोटी रुपयांची रक्कम सुमारे 1 हजार 153 कोटींनी अधिक आहे.
लाडकी बहीण योजनेचा धक्कादायक हिशेब
92 लाख अपात्र ठरलेले लाभार्थी
9,605 कोटी अपात्र लाभार्थ्यांना वितरित निधी
76,231 कोटी 24 महिन्यांतील योजनेवरील एकूण खर्च
1 कोटी 65 लाख सध्या लाभ घेणाऱ्या महिला
62 लाख ई-केवायसी न केल्याने वगळलेले लाभार्थी
16 लाख उत्पन्न मर्यादा ओलांडल्याने वगळलेले
4.50 लाख सरकारी कर्मचारी लाभार्थी यादीतून वगळले
8,452 कोटी 31 मार्च 2025 रोजी पीएम केअर्स निधीतील शिल्लक

Related

Tags: indiakrushival mobile appladki bahin yojnamaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi news
Previous Post

बनावट मृत्यू प्रमाणपत्र दाखवून कोट्यवधींच्या जमिनीवर डोळा

Next Post

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

२४ वर्षांची परंपरा, आता Gen-Z च्या हाती वारसा; मानाच्या दहीहंडीला प्रशांत नाईक यांची नवी दिशा

August 23, 2026
चिंचोटीतील ‌‘जलजीवन‌’ चौकशीच्या फेऱ्यात!
sliderhome

चिंचोटीतील ‌‘जलजीवन‌’ चौकशीच्या फेऱ्यात!

August 23, 2026
अपघात

गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू

August 23, 2026
sliderhome

ग्रामसेवकांच्या हजेरीवर आता ‌‘डिजिटल‌’ लक्ष!

August 23, 2026
ऐन सणासुदीत महागाईचा नारळ!
sliderhome

ऐन सणासुदीत महागाईचा नारळ!

August 23, 2026
एकाच रस्त्याला दोनदा निधी?
sliderhome

एकाच रस्त्याला दोनदा निधी?

August 23, 2026
Next Post
वसुलीसाठी महावितरणची सक्तीची मोहीम

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?