श्रीस्वामिनारायण गुरुकुल शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम


| रसायनी | वार्ताहर |

चौक येथील श्रीस्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी तिरंगी फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत श्रीस्वामिनारायण गुरुकुलचे मुख्याध्यापक डॉ. पी.हरी बाबू यांनी केले. सगुणा बागचे चंदन बडसावले व सुनील गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत व प्रार्थनेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत, विविध देशभक्तीपर गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी श्रीस्वामिनारायण गुरुकुलचे संचालक विश्‍वमंगलदास स्वामी, ब्रम्हस्वरूप स्वामीजी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुलचे सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थीवर्ग व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version