जिल्हा पोलीस दलातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम


| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मेरा देश मेरा गुरुर हा देशभक्ती पर गीत व सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजीत बडे यांसह विविध अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. दिव्यांग व विशेष कलाकरांनी आपली कला सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली होती.

Exit mobile version