| कर्जत | प्रतिनिधी |
मंगळागौर म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतला एक हळवा धागा, सर्व जाती धर्माचे नागरिक नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदार आमदार महेंद्र थोरवे आणि ‘महेंद्र फाऊंडेशन’च्या वतीने श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवाचे निमित्ताने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रॉयल गार्डनमध्ये सभागृहात मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन शिवसेना महिला आघाडी कर्जत तालुका आयोजित मंगळागौरीचे खेळ व हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला मराठी सिनेअभिनेत्री व शिवसेना नेत्या डॉ. दिपाली सय्यद-भोसले व बाई पण भारी देवा फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, तसेच कर्जत खालापूर शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
यावेळी आमदार थोरवे यांनी महिलांची संख्या बघून बाई पण भारी देवा.. आणि पुढे महिला सर्वच क्षेत्रात जशा पुढे आहेत, तशाच परंपरा जपण्यात ही पुढे असल्याचे दाखवून दिले आहे. पारंपरिक सण उत्सवाची परंपरा जपली जावी, नव्या पिढीला त्याचे आदान प्रदान व्हावे, खेळ व गाण्यांच्या माध्यमातून मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे, या महिलाच्या कलागुणांना वाव मिळण्याचे काम आपण केले असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भाषणात सांगितले.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी या जगात धावपळीच्या युगात परंपरा कमी झाल्या आहेत. दैनंदिन कामकाजातून महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे, म्हणून मंगळागौर, भोंडला असे अनेक छोटे छोटे कार्यक्रम पडद्याआड होत आहे. आणि यांना पुन्हा वाव देण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन आपले सुखदुःख एकमेकींसोबत वाटत परंपरा महिलांनी जपली आहे. तसेच स्वत:ची आवड जोपासता यावी. मंगळागौर सणाचे विशेष महत्त्व सर्वांना कळावे, यासाठी प्रत्येक ठिकाणी मंगळागौरचे आयोजन केले जातं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मंगळागौरीची पूजा करून करण्यात आली.तसेच या कार्यक्रमात अभिनेत्री शिवसेना नेत्या डॉ.दिपाली सय्यद-भोसले व बाई पण भारी देवा फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनीदेखील महिलांच्या घोळक्यात राहून आनंद लुटला आहे.