उसर हायस्कूलमध्ये अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला

। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.2) दुपारी 1 ते 4 जुलैला सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन जवळपास एक ते सव्वा लाख रुपयांच्या मालावर हात साफ करून पोबारा केला. याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी संधी साधुन हायस्कूल मधील 9 वी च्या वर्गाचे कुलुप तोडून बॅटरी रूमचे लॉक तोडून शाळेच्या रूममध्ये प्रवेश करून वस्तू काढल्या. तसेच शाळेच्या आवारात असलेल्या चार सोलर प्लेट्स, 15 हजार रुपयांचा स्मार्ट टीव्ही, 80 हजार रुपयांचा ल्युमिनस कंपनीच्या 10 बॅटर्‍या, 20 हजार रुपयांच्या ल्युमिनस कंपनीच्या 4 सोलर प्लेट असा जवळपास अंदाजे सव्वा लाख रूपयांचा माल घरफोडी करून चोरीस गेल्याची घटना घडल्याची माहिती फिर्यादी मुख्याध्यापिका अंजली धारसे यांनी दिली. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील, तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी भेट देऊन पाहणी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे व सहकारी करीत आहेत.

Exit mobile version