अवकाळीमुळे वीटभट्टी मालकांचे नुकसान

| खोपोली । प्रतिनिधी ।
तालुक्यातील काही भागात 16 मार्चच्या सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस बसरण्याचे वातावरण निर्माण झाल्याने सर्वत्र ठिकाणी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सर्वानाच उष्णतेपासून सुटका मिळाली, असली तरी, वीटभट्टी मालकांची या अवकाळी वरुणराजामुळे मोठीच धादळ उडाली असल्याचे सर्वत्र चित्र पाहायला आहे. वीटभट्टी मालकांनी आपल्या कच्च्या वीटा भिजू नये, या करिता प्लास्टिक कागदाची शोधाशोध करण्यात अनेक वीटभट्टी मालकांची धावपळ करावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय सुरू आहे. 16 मार्चच्या सायंकाळच्या सुमारास अचानकपणे अवकाळी वरुणराजा बरसला नसला तरी, सुध्दा आपण तयार करित असलेल्या कच्च्या मालाचे नुकसान होऊ नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वीटभट्टी व्यापारी व मालक काळजी घेत प्लास्टिक कापड टाकून वीटांची संरक्षण केली आहे.

या अवकाळी पावसामुळे आम्ही तयार केलेल्या सर्व कच्च्या वीटाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यामुळे आमच्या मेहनतीवर पूर्णपणे पाणी फेरत आम्हाला अर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असते. – वीट कामगार

Exit mobile version