। बुलडाणा । वृत्तसंस्था ।
जसं जालियानवाला बाग मधील हत्याकांड घडलं होतं त्याचं पद्धतीने या कोरोनाच्या काळात जे लोक मरण पावले याला सर्वस्वी जबाबदार भाजप आहे. अशा कुटुंबांची पंतप्रधान मोदींना जाहीर माफी मागावी. हे भारतातील कोरोनाच्या काळातील मृत्यू हे भाजपनं घडवलेलं हत्याकांड आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दिली आहे. ते खामगाव येथे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या विजय संकल्प कार्यक्रमात आले असता त्यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, तसेच अफगाणिस्तानात जे घडत आहे. ते धार्मिकेतच्या नावावर घडत आहे. तालिबान्यांनी ते ताब्यात घेतलं आहे. अनेक अफगणिस्तानातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत. अशा अफगानी विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वस्वी मदत करेल असेही आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिले. जालन्यात बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, हे सरकार फार काळ टिकणार नाही असंही भाजपकडून सांगितलं जातं. मात्र महाविकास आघाडी सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथनी आहे. अमर, अकबर, अँथनी हा सिनेमा त्यांनी बघितला नसेल. अमर, अकबर, अँथनी हे अन्याय, अत्याचाराविरोधात होते. लोकांना न्याय देणारे होते. म्हणून तो सिनेमा हिट झाला होता. तसेच हे सरकार त्याच पद्धतीने जनतेमध्ये हिट होणार असल्याचे त्यांनी म्हटलं.