| आगरदांडा | प्रतिनिधी |
रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष पत्रकार भारत रांजणकर यांच्या मातोश्री गीता तथा सुरेखा गजानन रांजणकर यांचे रविवार, दि.24 रोजी आकस्मिक निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर एकदरा मुरुड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात संतोष, भारत दोन पुत्र आणि सुचिता कन्या, स्नुषा, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य मंगळवार, दि.2 जानेवारी रोजी व बारावे तेरावे 5 जानेवारी एकदरा येथे होणार असल्याची माहिती रांजणकर कुटुंबियांनी दिली.
भारत रांजणकर यांच्या आईचे निधन
