। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील पुगाव येथील शेकापचे ज्येष्ठ नेते शंकर म्हस्कर यांचे सुपुत्र डॉ. सतेज म्हस्कर यांना 29 मार्च रोजी इंग्लंड येथे रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ इंग्लंडची एफआरसीएस पीडियाट्रिक सर्जरी ही डिग्री प्राप्त झाली आहे. रॉयल कॉलेजचे प्रेसिडेंट मा. टीना मिशेल यांच्या हस्ते ही डिग्री प्रदान करण्यात आली.
डॉ. सतेज म्हस्कर यांनी पहिली ते दहावी हे शिक्षण रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये, तर कॉलेजचे शिक्षण मुंबईमध्ये पुर्ण केले. तसेच पुढील शिक्षण पुणे येथे जाऊन करत एमबीबी, डीएनबी जनरल सर्जरी व एमएचसीएच पीडियाट्रिक सर्जरी सुपर स्पेशालिस्ट अशा पदव्या प्राप्त केल्या. त्यांनतर उच्च पदाच्या डिग्रीसाठी त्यांनी थेट इंग्लंड गाठले आणि युरोपियन बोर्ड ऑफ पीडियाट्रिक सर्जरी आणि युरोपियन बोर्ड ऑफ यूरोलॉजी या दोन डिगर्या संपन्न केल्या.