नितीन वाढवळ यांना पितृशोक

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक नितीन वाढवळ व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाढवळ यांचे पिताश्री व नगरपंचातीच्या विद्यमान नगरसेविका सुशीला वाढवळ यांचे पती शिवाजी दगडू वाढवळ यांचे सोमवारी ( दि.29) अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वाढवळ कुटुंबियांवर व मित्र परिवारावर तसेच कळमजे गावावर शोककळा पसरली आहे. यांच्यावर माणगाव पोलीस स्टेशनच्या मागील स्मशानभूमीत सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांचा दशक्रिया विधी बुधवार (दि. 7) मूळ गाव कळमजे येथे होणार असून उत्तरकार्य विधी गुरुवार (दि. 8) राहते घरी आदर्श समतानगर विकास कॉलनी माणगाव येथे होणार असल्याचे त्यांचे पुत्र नितीन वाढवळ यांनी सांगितले.

Exit mobile version