तुकाराम घोसाळकर यांचे निधन

| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील कुंभार आळी भागातील रहिवासी तसेच नागोठण्यातील वारकरी सांप्रदायाचे एक प्रमुख आधारस्तंभ ह.भ.प. तुकाराम पांडुरंग घोसाळकर यांचे बुधवार, दि. 11 मे रोजी सकाळी आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर के.एम.जी. विभाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारास नातेवाईक, समजाबांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. तुकाराम घोसाळकर यांच्या पश्‍चात पत्नी, पुतण्या अमोल घोसाळकर, सुन, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. कै. तुकाराम घोसाळकर यांचे दशक्रिया विधी शुक्रवार, दि. 20 मे रोजी नागोठण्यातील शृंगार तलाव येथे तर उत्तरकार्य (बारावे) रविवार, दि. 22 मे रोजी कुंभार आळी, नागोठणे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती घोसाळकर कुटुंबियांकडून देण्यात आली.

Exit mobile version