सल्लागार समितीची घोषणा

| नेरळ | वार्ताहर |

मध्य रेल्वे मार्गावरील शेलू रेल्वे स्थानक प्रवासी सल्लागार समिती सदस्य यांची नावे मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आली. वांगणी -भिवपुरी रोड विभागाचे कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी शेलू येथे रेल्वे सल्लागार समिती सदस्यांना नियुक्ती पत्र दिली. शेलू हे रेल्वे स्थानक 25 वर्षापूर्वी निर्माण झाले असून या स्थानकात प्रवाशांच्या सोयी सुविधा आणि अडचणी सोडविण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही प्रवाशांची स्थानक रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे. त्यात दीपक शेकटे, विनायक मसणे, परशुराम मसणे, रोहिदास मसणे यांचा समावेश आहे.

Exit mobile version