पाऊस यावर्षी वेळेआधीच केरळ मध्ये दाखल
। मुंबई। प्रतिनिधी।
दरवर्षी ज्या पावसाच्या सरींसाठी शेतकरी आशेने वाट पाहत असतो तो यंदा तब्बल 8 दिवस आधीच केरळ येथे दाखल झाला आहे. 16 वर्षांनंतर यावर्षी पावसाळ्याने वेळेपूर्वी हजेरी लावलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2009 मध्ये पावसाने केरळ मध्ये 23 मे रोजी हजेरी लावली होती व त्यांनतर यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये 24 मे रोजी पाऊस दाखल झाला आहे. तब्बल 16 वर्षांनंतर पावसाने यंदा पुन्हा वेळे आधी हजेरी लावलेली आहे. पुढे हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 13 मे रोजी म्हणजेच नियोजित वेळेचा 5 दिवस आधी पाऊस अंदमान निकोबार बेटांमध्ये दाखल झाला. बुधवारी मान्सून श्रीलंकेत दाखल झाला. पाच दिवसांमध्ये म्हणजे रविवारी मान्सून केरळमध्ये हजेरी लावेल, असं हवामान विभगााने सांगितलं होतं. बुधवारीच मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिनच्या काही भागांमध्ये दाखल झाला. तसेच बंगालचा उपसागरातही हजेरी लावली. गुरुवार, शुक्रवारी हा भाग व्यापल्यानंतर रविवारी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला होता. पाऊस देशात दाखल होण्याची सरासरी 1 जुन अशी आहे पण यंदा पाऊस आठ दिवस आधीच चालू झाल्यामुळे पावसाळ्याची सुरवातही चांगली होण्याची शक्यता आहे.