सोशल मीडियाद्वारे महिलेची बदनामी


| नागोठणे | वार्ताहर |

सोशल मीडियाद्वारे महिलेची बदनामी करण्यात आल्याची घटना शिहू, पेण येथे घडली आहे. अज्ञात इसमाने शिहू, पेण येथे राहणार्‍या महिलेच्या नावाने इंस्टाग्रामवर फेक खाते उघडले होते. अज्ञात इसमा विरोधात नागोठणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, या खात्याद्वारे त्याने गावातील अन्य लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी संपर्क केला. सदर महिलेचे क्रॉप केलेले फोटो गावातील लोकांना पाठवून बदनामी केली. याप्रकरणी महिलेने नोगोठणे पोलिसात तक्रार केली असून, अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण करीत आहेत.

Exit mobile version