देगलूरची पोटनिवडणूक 30 ऑक्टोबरला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील देगलूरसह देशाच्या विविध भागातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 30 जागांसाठी येत्या 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी करण्यात आली.

देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं 9 एप्रिल रोजी निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे देगलूर विधानसभेची जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी निवडणूक होत आहे. या रिक्त जागेवर काँग्रेसकडून अंतापूरकर यांच्या कुटुंबातील सदस्यालाच निवडणुकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version