आरटीएफचे प्रवेशाचे अर्ज भरण्यास दिरंगाई

| खोपोली | प्रतिनिधी |

आरटीएफ मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यात पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठीची अंतीम तारीख असताना गटविकास शिक्षणाधिकारी यांच्याकडून दिरंगाई केली जात असल्यामुळेच पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे. पंचायत समितीचे सदस्य अक्षय पिंगळे यांनी आक्रामक पवित्रा घेत खालापूर पंचायत समिती समोर बसून ठिय्या आंदोलन करीत गलथान कारभाराविरोधात जाब विचारला आहे.

2023 व 2024 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी 25 टक्के विद्यार्थी वर्गासाठी आरटीएफ मोफत आरक्षित प्रवेश दिला जातो. यासाठी खालापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये पालकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचे होते. यासाठी शिक्षण अधिकारी यांचा शेरा महत्वाचा असल्याने खालापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज प्रक्रिया केली होती.

मात्र यावर गटशिक्षण अधिकारी चोरमोळे यांनी आपल्या विभागाची जबाबदारी असताना सही, शिका व ऑनलाइन अर्ज केलेच नसल्याने सोमवारी अंतिम तारीख असल्याने पालकांनी गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात गेले असता, ते त्यांच्या जागेवर हजरच नसल्याने पालक वर्गासमोर मोठा प्रसंग उभा राहिल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत पंचयत समितीच्या प्रवेश घेत ठिय्या केले. जोपर्यंत गटशिक्षणाधिकारी येत नाहीत तो पर्यंत उठणार नाही, असा पवित्रा घेतल्याने गटशिक्षणाधिकारी चोरमोळे आल्याने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी अक्षय पिंगळे, विश्वनाथ पाटील, उत्तम परबलकर, रोहित विचारे, किरण हडप, गोपीनाथ सोनावणे पालक वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version