चार जणांवर गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे येथील तुळशी ही सिटीमधील किशोर अशोक करंजकर यांनी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला दुखापत करणाऱ्या चार व्यक्तींविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.16 ते 19 जूनदरम्यान पाषाणे येथे तुलसी व्हिसिटी, सोसायटीच्या आवारात पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला मारहाण करीत होते. त्याबाबतची माहिती सीसीटिव्ही फुटेज पाहणी करीत असताना प्राणीमित्र किशोर करंजकर यांना मिळाली. अनिल गंगावणे हा व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याच्या पायाला दुखापत करीत होते. त्यावेळी अभिषेक शिंदे आणि बोरसे नामक महिला आणि एक अनोळखी महिला या अनिल गंगावणे यांना मुक्या प्राण्याला मारहाण करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना आढळून आले. यावेळी त्यांनी हातातील लाकडी काठीने कुत्र्याच्या पायावर मारून त्यास दुखापत केली. तर त्यावेळी हे कृत्य करण्यास अडविले असता तेथील बोरसे नामक महिला आणि अन्य महिला या अश्लील भाषेत शिव्या देत होत्या. कुत्र्याला मारहाण करणारे अनिल गंगावणे,त्यावर प्रोत्साहन देणारे अभिषेक शिंदे तसेच बोरसे नामक महिला आणि अन्य अनोळखी महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
