शौचालय केबिन तात्काळ हटवण्याची मागणी

| महाड | प्रतिनधी |

महाड बाजारपेठेमधी डोंगरी पुलावर बसविण्यात आलेल्या शौचालय केबिनमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ती केबिन तात्काळ या ठिकाणाहून हटविण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

महाडकरांच्या सोयीसाठी बसविण्यात आलेल्या शौचालयाच्या केबिनचा वापर न करता काही नागरिक त्याच्या बाहेरच शौचालय अथवा लघुशंका करतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरु लागली आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरुन जावे लागत आहे. याठिकाणी रोगराई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यापारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाडकर नागरिक तसेच स्थानिक व्यापारी त्रस्त झाले आहेत. तेथील स्थानिक व्यापारी व रहिवाशांच्या मागणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाड शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी महाड नगरपालिकेला निवेदन दिले असून, डोंगरी पुलावरील शौचालय केबिन तिथून हटवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version