ठाणे ते पाली नियमित बसेसची मागणी

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुकावासियांसाठी एसटी महामंडळाच्या खोपट आगारातून बसेस सोडण्यात येतात. मात्र यातील ठाणे-पाली-कोशिंबळे ही बस नियमित वेळेत येत नाहीत. ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुकावासियांना गावाकडे जाण्यासाठी एसटी हा एकमेव पर्याय आहे. ठाणे ते पाली-कोशिंबळे जाणारी एसटी बस बऱ्याच वेळा नियमित वेळेत जात नाही व मुख्यतः जुनी नादुरुस्त गाडी पाठविली जात असते. तसेच, जुन्या डिझेलच्या बसेस सीएनजीमध्ये रुपांतरीत केलेल्या चढणीवर चढत नाहीत व डिझेल बसेस कमी असून नादुरुस्त आहेत त्यामूळे ती मधेच बंद पडते. कधी खोपोलीपासून तर कधी पालीपासून अर्ध्यावर प्रवासी सोडून परत येते. ती शेवटच्या स्थानकापर्यत जात नाही. पाली गावाच्या पुढील 40 गावांना या बसशिवाय दुसरा पर्याय नसल्याने सुधागडवासियांची प्रवासाची गैरसोये लक्षात घेवून या मार्गावरील बसेस नियमित वेळेत व चांगल्या स्थितीतील सोडण्याची मागणी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांनी खोपट आगार व्यवस्थापकांना लेखी पत्राद्वारे सुचित केले आहे.

Exit mobile version