| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात सध्या 38 ते 39 तापमान असताना सुद्धा महावितरणकडून आठवड्याच्या दर मंगळवारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजे पर्यत किमान आठ तासापेक्षा जास्त वीज गेल्याने असंख्य नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत. यावर दुकानदार वेल्फेअर अससोशिएशन मोठी हरकत घेतली असून मंगळवारची लोडशेडिंगचे तास कमी करण्याची मागणी पेण अधीक्षक अभियंता मुलांनी यांच्याकडे केली आहे.
दुकानदार वेल्फेअर असोसिएशनने आपली कैफियत मांडताना सांगितले आहे कि, तालुक्यात दर मंगळवारी लोडशेडींगच्या नावाखाली आठ ते नऊ तास वीज घालवल्यामुळे थंड पेय विक्रेते यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. फ्रिजमध्ये सर्व पदार्थ व दुधाचे मोठे नुकसान होत आहे. त्याच प्रमाणे तापमान वाढल्याने ज्येष्ठ व्यक्तींना याचा मोठा त्रास होत असून त्यांची प्रकृती बिघडत आहे. त्यामुले मंगळवारचे लोडशेडिंग किमान तीन अथवा चार तासाचे करा अशी मागणी दुकानदार आसोशीएनने अधीक्षक अभियंता पेण यांच्या कडे केली आहे.