गुरव समाजावर अन्याय करणार्‍यांवर कारवाईची मागणी

| रसायनी । वार्ताहर ।

हिंगोली जिल्ह्यातील घोटा (देवी) तुळजाभवानी संस्थान येथील पुजारी गजानन किसन जगताप (गुरव) यांनी ट्रस्टच्या पदाधिकारी यांच्या जाचास कंटाळून गळफास घेतल्याबाबत. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये वंशपरंपरेने पूजा करणार्‍या गुरव पुजार्‍यांवर जीवघेणा हल्ला करून गेल्या एक महिन्यापासून मानसिक त्रास देणार्‍या समाजकंटकांवर कडक कारवाई व्हावी यासाठी अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश उपकार्याध्यक्ष सुरेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली अमोल गुरव, विजय ठोसर, भालचंद्र गुरव यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत शासनाने न्याय न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल गुरव समाज संघटनेच्यावतीने देण्यात आले.

Exit mobile version