अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे जेएसएम कॉलेजबाहेर निदर्शने

शेकडो कर्मचारी संपात सहभागी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

आश्‍वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करणे या मागण्यांसाठी राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले असून, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या या संपाला रायगड जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाबाहेर कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन करीत निदर्शने सुरु केली आहेत.

आज 20 फेबु्रवारीपासुन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी हा संप पुकारला असून, त्यामध्ये अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत तुळपूळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 13 महाविद्यालयातील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 20 फेबु्रवारीपासुन बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवार दि. 20 महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ संयुक्त कृती समितीच्या आयोजनानुसार शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा बेमुदत संप सुरू झालेला असून, प्रमुख मागण्याकरिता शासनाकडे दाद मिळावी म्हणून हा संप पुकारण्यात आला.

या संपाच्या माध्यमातुन शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आश्‍वासित प्रगती योजना पूर्वलक्षीप्रभावीपणे सुरू ठेवावी, रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचार्यां ची पदे त्वरित भरावी, दहा वीस तीस ही योजना त्वरित सुरू करावी व सन 2005 नंतर नियुक्त शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या संपकर्‍यांनी केल्या आहेत. अलिबागमध्ये अभिजीत तुळपूळे यांच्यासह जी के गिते, आर के शेलार, आर एच रोकडे, श्रीमती एस एस कोळी, श्रीमती एम व्ही वाघमारे आदी सहभागी झाले आहेत.

Exit mobile version