। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी परिसरातील शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष तथा देवळोलीचे ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र उर्फ देवा अनंत पाटील यांची पनवेल तालुका कृषी बाजार समितीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीवर सातत्याने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे.
यंदा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महाविकास आघाडीतर्फे सर्वसाधारण मतदार संघासाठी नारायण गोमाजी घरत, देवेंद्र गंगाराम मढवी, अशोक गणू गायकर, मच्छिंद्रनाथ गणा पाटील, बाळकृष्ण नारायण पाटील, महादू गोपाळ पाटील, अर्जुन पांडुरंग गायकर, महिला राखीव – ललिता गोपिनाथ फडके, सपना जीवन म्हात्रे, सुभाष हरिभाऊ पाटील (इतर मागास वर्ग), सखाराम गंगाराम पाटील (भटक्या विमुक्त जाती), ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण कांचन नारायण घरत (काँग्रेस), प्रताप चंद्रकांत हातमोडे (शिवसेना), देवेंद्र अनंत पाटील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), सुनिल दुकल्या सोनावळे (अनु. सुचित जाती/जमाती), व्यापारी मतदार संघ सर्वसाधारण वसंत काशिनाथ फडके, दिनेश ज्ञानेश्वर महाडिक, हमाल/मापाडी मतदार संघातून सर्वसाधारण सोमनाथ जनार्दन म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यामध्ये देवेंद्र अनंत पाटील यांच्यासमोर उमेदवारी अर्ज भरला गेला नसल्यामुळे देवेंद्र उर्फ देवा पाटील यांची बाजार समितीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.