आदिवासींना भकास करणारा विकास

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परियोजनमधून संबधित गावे नुकतीच वगळण्यात आली आहेत. परंतु, 124 गावांमध्ये नवनगर म्हणून निर्देशित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा (दि.04) मार्चचा निर्णय जाहीर झाला आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध झाली असून यामध्ये पेण तालुक्यातील 80 गावांचा समावेश आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता नाही. तसेच, केवळ जमीन मालकच नव्हे तर शेतमजूर, शेतीचा जोडधंदा करणारे मच्छिमार, गणपती कारखानदार व इतर संलग्न उद्योग करणा-या छोट्या-मोठ्या करागीरांवर याचा परिणाम होणार आहे. नैना, एमएमआरडीए आणि आता ‘नवनगर’ या विकासाच्या प्रारूपांनी येथील भूमिहीन आदिवासींना विचारात घेतलेले नाही. या प्रकारचा विकास हा आदिवासींची जीवन ‘भकास’ करणारा आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केल आहे.

Exit mobile version