अल्पवयीन मुलीची छेड काढल्याबद्दल गुन्हा दाखल
| पनवेल | वृत्तसंस्था |
अल्पवयीन मुलीसमोर प्रेम व्यक्त करणे एका रोमियो चांगलेच महागात पडले आहे. महेश लोखंडे असे रोमियोच नाव असून त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे. मिळालेल्या माहिती नुसार कळंबोली येथे राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीला लोखंडे हा मागील दीड ते दोन महिन्यापासून त्रास देत होता. सुरवातीला दुर्लक्ष केल्या नंतर ही आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाब आपल्या घरच्यांना सांगितली.
शुक्रवारी (दि.30) देखील आरोपीने मुलीची छेड काढत ‘मला तू आवडतेस’ असे सांगितले या वेळी मुलीच्या मागावर असलेल्या तिच्या वडलांनी या बाबत संबंधित आरोपीला जाब विचारताच आरोपी तरुण एका दुकानात लपून बसला काही वेळाने या बाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तो पर्यंत घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच संतप्त नागरिकांनी पोलिसांसमोरच आरोपीची चांगलीच धुलाई केली. बदलापुरात घडलेली घटना ताजी असतानाच कळंबोली मध्ये घडलेल्या घटनेमुळे वातावरण तापू नये या करता कळंबोली पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल केल्याने कळंबोली पोलिसांचे कौतुक होत आहे.