। उरण । वार्ताहर ।
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पिरकोण ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतल्याने पिरकोण गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, पिरकोण गावच्या सरपंच कलावंती पाटील, उपसरपंच दिपक पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार व्यक्त केले आहेत.
पिरकोण गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पिरकोण गावातील कुष्णा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, मुकुंद गावंड, अनिल पाटील तसेच गावातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे हिरीरीने सहभाग घेत आहेत. गणेशोत्सवात गावातील नागरिकांना, भाविकांना सुखकर प्रवास व्हावा यासाठी उपसरपंच दिपक पाटील यांनी सरपंच कलावंती पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. एकंदरीत खड्डे युक्त रस्ता, खड्डे मुक्त झाल्याने पिरकोण गावातील नागरिकांनी व भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.