। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला झालेल्या अपघाताच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली असून स्वत: धनंजय मुंडेंनी हे ट्वीट केलं आहे.