| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील पुई गावचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते धोंडू रामचंद्र सानप यांचे सोमवारी (दि. 24) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य नागरिक, नातेवाईक तसेच समस्त पुई ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पाच पुतणे, दहा पुतण्या, सुना, नातवंडे, पतवंडे व मोठा सानप परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवारी (दि.5), तर उत्तरकार्य विधी शनिवारी (दि. 8) पुई येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत.