धोनी अयोध्येला जाणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण पोहचलं आहे. हा सोहळा अयोध्येत 22 जानेवारीला होणार आहे. धोनीबरोबरच विराट कोहली, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर यांना देखील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. एमएस धोनीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-प्रांत सचिव धनंजय सिंह यांच्याकडून निमंत्रण मिळाले. अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी धोनीला औपचारिक निमंत्रण देण्यात आले. तेव्हा भाजपचे राज्य संघटनेचे सरचिटणीस कर्मवीर सिंग देखील उपस्थित होते.

Exit mobile version