| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि समाजसेवक मोहन कृष्णा धुमाळ यांचे शनिवारी (दि.9) निधन झाले. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांची शोकसभा आयोजित केली आहे. रविवारी (दि.31) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धुमाळ यांच्या निवासस्थानी चिखली येथे ही सभा घेतली जाणार आहे.
यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, खारेपाट विभागातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. मोहन धुमाळ हे कुसुंबळे पंचक्रोशीतील चिखली येथील रहिवासी होते. ते हाडाचे शिक्षक व समाजसेवक होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नातेवाईक, मित्र मंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात धुमाळ गुरुजींचे योगदान मोलाचे होते. त्यांची शोकसभा रविवारी घेण्यात येणार असल्याची माहिती शेकाप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.







