। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील निळगूण गावचे सुपुत्र तथा देगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिनेश नथुराम गुगले यांना आविष्कार फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने रविवारी (दि. 18) पन्हाळगड याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित व बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक, डूमुनी मुमर्र्, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोसर्जन व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संतोष प्रभू, विशेष निमंत्रित सदस्या मागासवर्गीय आयोग भारत सरकार सुरेखा लांबतुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंच दिनेश गुगले यांना उपरोक्त संस्थेकडून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून फाऊंडेशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, अॅड. पुंडलिक मालोरे, रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे व जिल्हा संघटक भालचंद्र खाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
आविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात गेली 19 वर्षे कार्यरत आहे. या फाऊंडेशनतर्फे समाजात वेगवेळ्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. यावर्षी फाऊंडेशनतर्फे पन्हाळगड कोल्हापूर याठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उपसरपंच दिनेश गुगले यांचा सामाजिक, राजकीय व कृषी क्षेत्रातील कामगिरी व समाजाप्रती काम करण्याची त्यांची असणारी आवड विचारात घेऊन त्यांचा संस्थेतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य पुरस्कार निवड समिती सदस्य माधुरी सावंत, फाऊंडेशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संदीप नागे, अॅड. पुंडलिक मालोरे आदी मान्यवरांसह राज्यभरातून पुरस्कारार्थी व नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.