माजगांवच्या सरपंचपदी दिपाली पाटील विराजमान

उपसरपंच पदी राजेश पाटील
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
माजगांव येथे खेळीमेळीच्या वातावरणात इंडिया आघाडीच्या थेट सरपंच दिपाली पाटील यांनी सरपंचपादाचा, तर उपसरपंच पदी राजेश शिवराम पाटील यांनी पदभार स्विकारला. यावेळी शेकडो ग्रामस्थ चाहत्यांनी पुष्प गुच्छ देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. थेट जनतेतून सरपंच निवडून आल्यामुळे या ठिकाणी प्रचंड स्वरूप गर्दी झाली होती. फटाक्याच्या अतिषबाजी आणी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

राजेश पाटील यांनी या अगोदर उप सरपंच पद हे भुषविले होते. शिवाय त्यांस अनुभव असल्यामुळे उपसरपंच पद मिळाले आहे. यावेळी सदस्या अर्पणा यशवंत शिंदे, प्रांजळ प्रदिप जाधव, वैशाली नितिन महाब्दि, वंदना सुधाकर महाब्दि, सरिता कमलाकर वाघे, पुनम प्रकाश जाधव, सदस्य शशिकांत गजानन पाटील, मधुकर गायकवाड उपस्थित होते. शिवसेनेचे नेते आत्माराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर सभापती जयवंत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर उपसभापती धनाजी पाटील, राष्ट्रवादी नेते सुरेश पाटील, ग्राम पंचायत वडगांव सदस्य नंदकुमार पाटील, विभागप्रमुख राजेश ढवालकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version