| रायगड | खास प्रतिनिधी |
प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकांना रायगड पोलिसांनी नाेटीस पाठवली आहे. विविध मद्द्यांवर संचालकांकडून माहिती मागवण्यात आली आहे. दि.8 राेजी सकाळी दहा वाजेपर्यंत खालापूर पाेलिस ठाण्यात हजर राहून माहिती सादर करण्याचे आदेश रायगड पाेलीसांनी दिले आहेत.
दि.4 राेजी नितीन देसाई यांनी आत्महत्ये केली हाेती. वित्तीय संस्थांच्या जाचाला कंटाळून त्यांनी जीवन संपल्याची तक्रार देसाई यांची पत्नी नेहा यांनी खालापूर पोलीसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.