कामांचा ऑनलाईन भूमिपुजन कार्यक्रम
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील कोलाड, माणगाव आणि वीर या रेल्वेस्थानकांचे रस्ता काँक्रिटीकरण आणि सुशोभिककरण करणे कामांचा ऑनलाईन भूमिपुजन कार्यक्रम उद्या दि.8 रोजी सकाळी 11 वा. पार पडणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
कोलाड, माणगाव आणि वीर या प्रत्येक स्थानकाचे सुशोभिकरण करून प्रवाशांना थांबण्यासाठी आधुनिक कॅनॉपी शेड, आसन व्यवस्थेसह व पोच मार्गाचा काँक्रिट रस्ता, फुटपाथ इ. बाबींसह सुसज्ज स्थानक बनविण्यात येणार आहे. तसेच या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी दुचाकी, रिक्षा व चार चाकी वाहनांकरिता प्रशस्त पार्किंग, आकर्षक बगीचा व आधुनिक स्त्री व पुरुष स्वच्छतागृह, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे. ही सर्व रेल्वे स्थानके सर्व सोयीने आधुनिक बनविण्यात येणार आहेत.