नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पेटीमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन चे शेअर्स लिस्टिंगच्या दुसर्या दिवशीही घसरत राहिले. मात्र, मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये थोडी खरेदी झाली. कंपनीचा शेअर बीएसईवर 1,434 रुपयांवर व्यवहार करत आहे. 8 नोव्हेंबरला बाजारात आलेला आयपीओ 10 ला बंद झाला. मात्र, देशातील सर्वात मोठ्या आयपीओने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.
वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार, या दोन दिवसांत पेटीएमच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांचे जवळपास 900 दशलक्ष (रु. 6,690 कोटी) बुडाले आहेत. पेटेमने याच महिन्यात महिन्यात आपला आयपीओ लॉन्च केला. बाजारात येण्याआधी भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा खझज असल्याचं सांगितलं जात होतं. त्याचं लिस्टिंग खूप खराब होतं. प्रचंड विक्रीच्या दबावामुळे, पेटीएमचे शेअर्स सोमवारी छडए वर 12.74 टक्क्यांनी घसरून 1,362.00 रुपयांवर बंद झाले. हे त्याच्या प्रसिद्ध केलेल्या किंमतीपेक्षा सुमारे 37 टक्क्यांनी कमी होतं.